टाईन नदी
टाईन नदी : उत्तर इंग्लंडमधील पूर्ववाहिनी नदी. लांबी सु. ४८ किमी. किंवा नॉर्थ टाईन धरून १२८ किमी. कंबर्लडमधील क्रॉसफेलहून आलेली साउथ टाईन व चेव्ह्यट टेकड्यांमधून आलेली नॉर्थ टाईन यांच्या संगमापासून पूर्वेस ही न्यूकॅसल अपॉन टाईन, गेट्सहेड, साउथ शील्ड्स यांवरून जाऊन टाईनमथ येथे उत्तर समुद्राला मिळते.